Ahmednagar News : ‘झेडपी’त दालनाची तोडफोड; ‘जलजीवन’च्‍या निकृष्ठ कामाची चौकशी होत नसल्याने संताप

जलजीवन पाणी पुरवठा योजनेद्वारे सुरू असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी केल्याचा प्रशासनाचा दावा
 ‘झेडपी’त दालनाची तोडफोड; ‘जलजीवन’च्‍या निकृष्ठ कामाची चौकशी होत नसल्याने संताप
‘झेडपी’त दालनाची तोडफोड; ‘जलजीवन’च्‍या निकृष्ठ कामाची चौकशी होत नसल्याने संताप Sakal

अहमदनगर : जलजीवन पाणी पुरवठा योजनेद्वारे सुरू असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी होत नसल्याने संतापलेले जनआधार सामाजिक संघटनेचे प्रकाश पोटे यांनी आज जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा विभागाच्या दालनाची तोडफोड केली.

दरम्यान, या कामाची यापूर्वीच चौकशी केली असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केला आहे. या प्रकरणी पोटे यांच्‍याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नगर तालुक्यातील घोसपुरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले. यात घोसपुरी योजनेंतर्गत १५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामध्ये ७ नवीन टाक्यांसह नवीन पाइपलाइनचे काम सुरू आहे.

मागील आठवड्यात जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत घोसपुरी योजनेत समाविष्ट असणाऱ्या बाबुर्डी घुमट येथील पाइपलाइन पुन्हा खोदून काढली असता त्या ठिकाणी केवळ एक ते दीड फूट एवढीच पाइपलाइन जमिनीत गाडली असल्याचे आढळले.

असेच निकृष्ट काम भातोडी पारगाव, कोल्हेवाडी, हातवळण येथेही झालेले आहे. शासनाने जलजीवन योजनांच्या कामांसाठी पाच हजार कोटींचा निधी दिलेला आहे. परंतु हा निधी मातीत घालण्याचे काम अधिकारी-ठेकेदार करत आहेत.

हे काम निकृष्ट असतानाही अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची बिले काढली आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडधे यांच्याकडे वारंवार चौकशीची मागणी केली. मात्र, अधिकाऱ्यांनी चालढकल केली. त्यामुळे संतापून प्रकाश पोटे यांनी गुरुवारी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय फोडले.

दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

प्रकाश पोटे यांच्या तक्रार अर्जावर जिल्हा प्रशासनाने पूर्वीच कार्यवाही केलेली आहे. कोल्हेवाडी व हातवळण या दोन्ही ठिकाणी त्रयस्थ यंत्रणेमार्फत गावचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तपासणी केली आहे.

ग्रामपंचायतीचा काम समाधानकारक असल्याचा अहवालही आहे. परंतु प्रशासनाची जाणीवपूर्वक बदनामी करून अधिकारी, कर्मचारी यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न पोटे करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष

जलजीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार दिले, तरी या कामाची चौकशी झाली नाही. उलट ठेकदाराला कामाचे दहा टक्के बिल देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तक्रार अर्जाची गांभीर्याने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ कार्यालयाची तोडफोड केली असल्याचे प्रकाश पोटे यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत सांगितले.

पोटेंविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हा परिषदेतील कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपकार्यकारी अभियंता विनोद देसाई यांच्या फिर्यादीवरुन प्रकाश पोटे विरोधात गुन्हा दाखल झाला. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान व धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. कोतवाली पोलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

जिल्हा परिषद कार्यालयातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात झालेल्या तोडफोडीचा मी निषेध करतो. संबंधित व्यक्तीच्या तक्रारीची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी झाली आहे. त्यात काही तथ्य आढळले नाही, असे रिपोर्ट आहेत. अशा प्रवृत्ती वाढीस लागल्याबद्दल मला व्यक्तिशः अतिशय वाईट वाटत आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही पोलिसांकडे सुरक्षेची मागणी करणार आहोत.

- आशिष येरेकर, जिल्हा परिषद सीईओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com