
-मार्तंड बुचुडे
पारनेर: खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या शिवकालीन गडकोटांचे संवर्धन व स्वच्छतेसाठी ‘आपला मावळा संघटने’च्या वतीने प्रतापगडावर आज ( ता. 24) सहावी दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मावळ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला.