Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीर

Pravin Tarde announces social initiative in Shirdi: ‘देऊळ बंद-२’चा शंभर कोटींचा संकल्प; नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या, विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी अर्पण
Shirdi Witnesses Noble Initiative as ‘Deool Band 2’ Makers Pledge Support for Farmers

Shirdi Witnesses Noble Initiative as ‘Deool Band 2’ Makers Pledge Support for Farmers

sakal

Updated on

-सतीश वैजापूरकर

शिर्डी: ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने आजवर ८० कोटी रुपयांची कमाई केली. लवकरच शंभर कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करील. चित्रपट निर्मितीसाठी खर्च झालेले आठ ते दहा कोटी रुपये वजा करून उर्वरित सर्व कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येईल. मुळचे कोपरगावचे चित्रपट निर्माते कैलास वाणी यांनी हा संकल्प यापूर्वीच केला. आज साईबाबांच्या शिर्डीत त्यांचा हा संकल्प जाहीर करीत आहे, अशी घोषणा देऊळ बंद या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com