सर्वदूर पावसाची हजेरी अन्‌ "या' कामाला आला भलताच वेग !

The presence of rain everywhere has brought speed to the work
The presence of rain everywhere has brought speed to the work
Updated on

नगर ः रोहिणी नक्षत्रात पावसाने चांगलेच मनावर घेतले. जिल्ह्यातील 97 पैकी 96 मंडलांत पावसाने सर्वदूर हजेरी लावली. त्यातच हवामान खात्याने यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे खरिपाचा हंगामाच्या मशागतीच्या कामाला वेग आला असून शेतशिवारात समाधानाचे वातावरण आहे. 

खरीप हंगामात यंदा जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पडणारा पाऊस खरिपाच्या हंगामासाठी चांगल्या उत्पन्नाची हमी देतो. कोरोना महामारीच्या संकटातही खरिपाच्या पूर्व मशागतीची कामे सुरू होती. त्यातच बळिराजाचे डोळे पावसाकडे लागले होते. एक जूनचा मुहूर्त गाठत पावसाने जिल्ह्यात आगमन केले. 

जिल्ह्यातील 97 पैकी 83 मंडलांत पावसाने हजेरी लावली होती. काल (मंगळवारी) पावसाने 97 पैकी 96 मंडलांत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केवळ पळशी (पारनेर) मंडलात पावसाचे खाते निरंक राहिले आहे. जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठात बियाणे, खते आणि पेरणीविषयक वस्तूंच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, शासकीय आकडेवारीनुसार पावसाची सरासरी 22.71 इतकी आहे. 

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (मिलीमीटरमध्ये) 
अकोले-27 
संगमनेर-24 
कोपरगाव-09 
श्रीरामपूर-18 
राहुरी-28.4 
नेवासे-34 
राहाता-05 
नगर-38 
शेवगाव-32 
पाथर्डी-10 
पारनेर-36 
कर्जत-28 
श्रीगोंदे-20.5 
जामखेड-08

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com