वडील म्हणाले तू नापास झाला आता शेतात औत धर... पण त्यांनाच राष्ट्रपती पदक जाहीर

शांताराम काळे
Friday, 14 August 2020

अतिदुर्गम चिंचोडी गावतील मुंबईतील वरीष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत गणपत बांगर यांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासचे त्रिसूत्री वापरून आपले कार्य कर्तृत्व पोलिस खात्यात दाखवून दिले.

अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील अतिदुर्गम चिंचोडी गावतील मुंबईतील वरीष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत गणपत बांगर यांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासचे त्रिसूत्री वापरून आपले कार्य कर्तृत्व पोलिस खात्यात दाखवून दिले. त्यांना शनिवारी (ता. १५) गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राजभवन, मुंबई येथे राष्ट्रपती पदक पुरस्काराने राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे. 

सूर्यकांत बंगर यांचे प्राथमिक शिक्षण, शेंडी तालुका अकोले, डहाणू येथे झाले. १० वीत अपयश येऊन ते आपल्या चीचोंडी गावी आले. वडील प्राथमिक शिक्षक होते. तर मोठे भाऊ चंद्रकांत बांगर पोलिस खात्यात होते. वडील म्हणाले तू नापास झाला आता औत धर शेती कर.

आपली शेती करायला कुणी नाही. त्यामुळे सूर्यकांत बांगर यांनी मनात पोलिस अधिकारी होण्याची इच्छा दाबून हो म्हटले. पण रात्रभर झोपले नाही. त्यादिवशी त्यांचे वडील बंधू चंद्रकांत बांगर आले. त्यांना वडिलांचा निर्णय मान्य झाला नाही. त्यांनी सूर्यकांत यांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी उल्हासनगर येथे आणले. दहावीचा  अभ्यास करण्यास सांगितले. जिद्दी सूर्यकांत यांनी अभ्यास करून चांगले मार्क मिळविले. मग मागे वळून पाहिलेच नाही. आर्ट शाखेतून पदवीधर होत असताना एमपीएससीचा अभ्यास करून १९९० पहिल्या प्रयत्नातच पास होऊन पोलिस विभाग अधिकारी म्हणून रुजू झाले.

रत्नागिरी,रायगड, ठाणे, बुलढाणा, धारावी, मुंबई या ठिकाणी अविरतपणे २९ वर्षेसेवा केली. गुंड, दोन नंबरवाले, भाईगिरी करणारे, खंडणीखोर यांना वठणीवर आणण्याचे काम करताना अनेक संकटाशी त्यांनी सामना केला. मात्र डगमगले नाही. बुलढाणा येथे सिंगम म्हणून ते प्रसिध्य आहेत. 

बुलढाणा येथे तीन वर्षांपूर्वी गणपती उत्सव सुरू होणार तोच मंदिरातील मूर्ती चोरी झाली. त्यावेळी बुलढाणा शहरात हिंदू बांधवांनी संताप व्यक्त केला. जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी व मंत्री, यांनी याबाबत पोलिसांना विचारणा केली. पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यावेळी सिंगम बांगर यांनी दिवसरात्र एक करून पाच दिवसात गणपती मूर्तीचा तपास करून चोरट्यांना जेरबंद करून मूर्तीची भव्य मिरवणूक काढून स्थापना केली. 

४०० गुन्हाचा तपास योग्य पद्धतीने लावल्याबद्दल विशेष पदक प्राप्त करणारे पोलिस अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवत त्यानंतर अशियाखंडतील धारावी झोपडपट्टी पोलिस स्टेशनला वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. भारत सरकार व पोलिस विभागाने त्यांची २९ वर्ष  गुणवत्तापूर्ण, उल्लेखनीय सेवा केली म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. १५ ऑगस्टला राजभवनावर राज्यपालांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Award announced to Suryakant Ganpat Bangar Senior Inspector of Mumbai Police