esakal | चहा-नाश्ता महागला! सामान्यांच्या खिशाला झळ; लॉकडाउनमध्ये आर्थिक कोंडमारा
sakal

बोलून बातमी शोधा

breakfast and tea

चहा-नाश्ता महागला; इंधन दरवाढीची सामान्यांच्या खिशाला झळ

sakal_logo
By
गौरव साळुंखे

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. वाढत्या महागाईचा फटका चहा-नाश्त्याला बसल्याने, रोज सकाळी लागणारा नाश्तादेखील महागला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर न जाताही सामान्य नागरिकांच्या खिशाला महागाईचा दाह बसू लागला आहे. चहाचे दर प्रति कप दोन रुपयांनी वाढल्याने सध्या चहाचा कप सात ते दहा रुपयांवर पोचला आहे, तर पोहे, साबूदाणा खिचडी, वडा-पाव, कांदा भजी, मिसळ-पाव, सामोसा यांसारख्या विविध प्रकारचा नाश्ता करण्यासाठी ग्राहकांना पाच ते दहा रुपये अधिक मोजावे लागत आहेत. सकाळी घरकाम अटोपून नोकरीसह शिक्षणानिमित्त घराबाहेर पडणारे अनेक जण चौकात येऊन चहा-नाश्ता करतात. आता नाश्तादेखील पाच ते दहा रुपयांनी महागला आहे. (Price-increase-Tea-and-breakfast-expensive-marathi-news-jpd93)

लॉकडाउनमध्ये आर्थिक कोंडमारा

नोकरीसह शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात आलेले विद्यार्थी, अविवाहित नोकरदार, कर्मचारीवर्गाची येथील विविध चौकांतील नाश्ता सेंटरवर पहाटेपासून गर्दी असते. शहरात चहा- कॉफीसह वडा-पाव, पोहे, साबूदाणा खिचडी, सामोसा, असा खास नाश्ता मिळणारी नामांकित नाश्ता सेंटर अनेक आहेत. सकाळी नाश्त्यासाठी रांगाही लागत. त्यात गेल्या दोन वर्षांत महागाईचा आलेख वाढत असल्याने नाश्ता करणे महागले आहे.

दरवाढीचा फटका; चहा-नाश्ता महागला

१५ रुपयांना मिळणारी पोह्याची प्लेट आता २० रुपयांवर पोचली. दहा रुपयांना मिळणारा सामोसा, कचोरी, दाबेली पाच रुपयांनी महागली. १५ रुपयांना मिळणाऱ्या साबूदाणा खिचडीसाठी आता २५ रुपये मोजावे लागत आहेत. खाद्यतेल, साखर, शेंगदाणे, डाळी, साबूदाणा, मसाले, असे विविध पदार्थांचे दर झपाट्याने वाढले. त्यात आणखी भर म्हणून गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने, नाश्ता तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

महागलेले मेन्यू कार्ड

नाश्ता, सध्याचे दर, दोन वर्षांपूर्वीचे दर

चहा (प्रति कप) - सात रुपये पाच रुपये

कॉफी - १५ रुपये सात रुपये

पोहे - (प्रति प्लेट) २० रुपये १५ रुपये

साबूदाणा खिचडी- २५ रुपये २० रुपये

वडा-पाव - २० रुपये १५ रुपये

सामोसा - १५ रुपये १० रुपये

कांदा भजी - २० रुपये १५ रुपये

मिसळ-पाव- ४० रुपये ३० रुपये

हेही वाचा: सुखी संसाराला जुन्या प्रेमाचे ग्रहण! माहेर-सासरचे दरवाजे बंद

खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आवश्‍यक पदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाढत्या महागाईचा फटका ग्राहकांसह विक्रेत्यांनादेखील बसत आहे. - नीलेश नागले, हॉटेल व्यावसायिक

हेही वाचा: संपलेलो नाही; ‘झेडपी’सह विधानसभाही लढू!

loading image