
अहिल्यानगर : एका खासगी कोचिंग क्लासमधील शिक्षकाने १० वी मध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना ७ जुलै रोजी केडगाव येथील कोचिंग क्लासमध्ये घडली. याबाबत पीडित मुलीने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.