esakal | संगमनेर : अवैध कत्तलखांन्यावर तातडीने कारवाई करा - हिंदुत्ववादी संघटनांचा एल्गार
sakal

बोलून बातमी शोधा

Pro-Hindu organizations demand action against illegal slaughterhouses in sangamner

अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्याची हिंदुत्ववादी संघटनांचा मागणी

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (जि. अहमदनगर) : शहरातील बेकायदेशिर कत्तलखाने उध्वस्त करावे, आरोपींना तडीपार करावे, शहर पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निलंबित करावे या मागणीसाठी आज संगमनेरात हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

कारवाईत आढळले 1 कोटी 4 लाखांचे गोमांस

2 ऑक्टोबर रोजी बजरंग दलाच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस अधिकार्‍यांसमवेत संगमनेरातील कत्तलखान्यांवर छापा टाकला होता. या छाप्यात 1 कोटी 4 लाखांचे गोमांस मिळून आले आहे. संगमनेरात सर्रास कत्तलखाने सुरु असतांना पोलिस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे या घटनेने दिसून आले आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी असतांना देखील संगमनेरात कत्तलखाने सुरुच आहेत. या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढला. पोलिस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत मोर्चा प्रांत कार्यालयावर येवून धडकला.

हेही वाचा: राष्ट्रवादी आमदार लंकेच्या घरात शिरताच शरद पवारही अचंबित!

मोर्चात पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष प्रा. एस. झेड. देशमुख, बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर, भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले, भाजपाचे ज्ञानेश्‍वर कर्पे, राजेंद्र देशमुख, अमोल खताळ, शिवसेनेचे आप्पासाहेब केसेकर, सुदर्शन इटप आदि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुुरु केले आहे. आंदोलनकर्त्यांना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने हे सामोरे गेले. मात्र आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने ठिय्या आंदोलन सुरुच आहे.

हेही वाचा: कोपर्डी अत्याचार : मुंबई HC सुनावणीबाबत माहिती समोर

loading image
go to top