esakal | राष्ट्रवादी आमदाराच्या घरात शिरताच शरद पवारही अचंबित! झाले घामाघूम
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar nilesh lanke

राष्ट्रवादी आमदार लंकेच्या घरात शिरताच शरद पवारही अचंबित!

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

पारनेर (जि.अहमदनगर) : दुपारची वेळ.. घरात तोबा गर्दी... आमदार निलेश लंकेच्या घरात शिरताच शरद पवारही घामाघूम झाले. इतकं असूनही कोणतीही घाई न करता पवार यांनी कुटुंबाची आपुलकीने चौकशी केलीच तसेच नाश्ताही केला. पण लंकेंच्या घरात शिरताच शरद पवार अचानक अचंबित झाले....काय घडले नेमके?

लंकेच्या घरात शिरताच शरद पवारही अचंबित!

आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा डंका थेट देशभर पसरला होता. तसेच त्यांची साधी राहणी व तरुणांचे आयडोल म्हणून त्यांची पक्षात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. एक तरूण व होतकरू तसेच समाजात लोकप्रिय असे हे नेतृत्व असल्याने पक्षातही त्यांची प्रतिमा उंचावली आहे. पक्षात प्रती आर. आर. आबा म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे. शरद पवार जेव्हा अहमदनगरमध्ये महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आले. तेव्हा त्यांनी लंकेच्या घरीही भेट दिली. फुलांचा रस्त्यावर सडा, सुरेख अशा रांगोळ्या, फटाक्‍यांची अताषबाजी, घोषणांचा निनाद व फुलांचा वर्षावात माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हंगे (ता. पारनेर) येथे आमदार नीलेश लंके यांच्या गावी स्वागत करण्यात आले. पण लंकेच्या घरात शिरताच ते अचंबित झाले....

हेही वाचा: Shirdi International Airport: शिर्डी विमानतळावर उड्डाणे होणार

पवारांना खूप घाम येत होता...

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष पवार यांनी आज अचानक आमदार नीलेश लंके यांच्या घरी भेट दिली. लंके यांची साधी राहणी व साधे घर पाहून शरद पवारही अचंबित झाले. दुपारची वेळ छोटे खाणी पत्र्याचे घर व घरात तोबा गर्दी त्यामुळे शरद पवार घामाघूम झाले. घरात एकच छोटा छताला टांगलेला पंखा त्याचीही हवा लागत नसल्याने पवारांना खूप घाम येत होता. तरीही त्यांनी कोणतीही घाई न करता कुटुंबाची आपुलकीने चौकशी केलीच तसेच नाश्ताही केला. लंके यांच्या मुलाला तो कोणत्या इयत्तेत व कोणत्या शाळेत शिक्षण घेतो, याचीही चौकशी केली. त्यांच्या मातोश्री शकुंतला व वडील ज्ञानदेव लंके यांनी त्यांचा सत्कार केला. आमदार लंके यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या सदस्य राणी लंके यांनी त्यांचे स्वागत केले.

अतिशय साध्या पध्दतीने स्वागत व सत्कार

पवार हे नगर येथे महामार्गाच्या उद्‌घाटनासाठी आले असताना, त्यांनी अचानक आमदार लंके यांच्या हंगे येथील राहत्या घरी भेट दिली. त्यांच्या समावेत पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार होते. पवार यांचा लंके यांच्या घरी अतिशय साध्या पध्दतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: कोपर्डी अत्याचार : मुंबई HC सुनावणीबाबत माहिती समोर

loading image
go to top