
कामगारांची मिरवणूक
सोनई - देवगाव (ता. नेवासे) येथे ऊसतोडीचे काम वेळेत पुर्ण केल्याबद्दल मुकादमाने पन्नास कामगारांची गावातून वाजतगाजत जल्लोषात मिरवणूक (Procession of sugarcane workers) काढली. सामाजिक काम करणाऱ्या युवकांनी कष्टाची कदर म्हणून सर्वांना मिठाई वाटप करून या कामगारांना शुभेच्छा दिल्या.
नेवासे तालुक्यातील देवगाव परीसरात असलेल्या उसाची तोडणी व वाहतूक करण्यासाठी मुकादमाने पन्नास ऊसतोड कामगारांची टोळी एकत्र करून गावात आणली होती. ट्रॅक्टर चालक हरिभाऊ कर्डिले, अदिनाथ कर्डिले व मोहन कर्डिले यांनी कुठलीही सुट्टी न घेता सलग सहा महिने काम केले. मुकादमाच्या नियोजनानुसार टोळीतील पन्नास कामगारांनी ठरवून दिलेले काम वेळेच्या आगोदर पुर्ण केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करण्याचे नियोजन केले.
देवगाव येथील मुळा कालव्याजवळ राहात असलेल्या तोडणी कामगारांची बॅंड व डीजेच्या आवाजात गावातून मिरवणूक काढण्यात आली. श्रीराम मंदीर चौकात ऊस तोडणी कामगार रवी वाल्हेकर, बाळासाहेब वाल्हेकर, सीताराम डाके यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते जैद शेख यांनी केला. यावेळी विराज वाल्हेकर, प्रमोद निकम यांच्यासह संपूर्ण गाव या आगळ्यावेगळ्या उत्सवात सहभागी झाला होता.
Web Title: Procession Of Sugarcane Workers At Devgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..