भिंगार नाल्याजवळील जमिनीमागील ससेमिरा संपेना 

Property owners near Bhingar Nala in financial crisis
Property owners near Bhingar Nala in financial crisis

नगर : भिंगार नाल्याच्या गाळपेरीत अतिक्रमण करून प्लॉट काढल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली. त्यामुळे प्रशासनाने सारसनगर परिसरातील 107 प्लॉटचे हस्तांतर चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबविले आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ नऊच प्लॉट वादात असल्याने 107 प्लॉटचे जमीन हस्तांतर थांबवू नये. ही चौकशी लवकर पूर्ण करून नागरिकांच्या जमिनींमागील ससेमिरा संपवावा, अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी जनसंसदचे ऍड. श्‍याम आसावा यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की माळीवाडा सर्व्हे नंबर 149मधील भिंगार नाला व गाळपेर जमिनीमध्ये अतिक्रमण करत, कागदपत्रांमध्ये फेरफार करत प्लॉट पाडल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली. ही जमीन बिनशेतीत रूपांतरित होताना व रेखांकन मंजूर करताना मूळ मालकांनी चूक केली. त्यांना तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांनी मदत केली. असे असताना आताच्या मालमत्ताधारकांना विनाकारण वेठीस धरण्यात येत आहे. 2018पासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 107 प्लॉटऐवजी अतिक्रमणाबाबतची तक्रार असलेल्या नऊच प्लॉटच्या हस्तांतरास मनाई करावी. मनाईमुळे प्लॉटचे हस्तांतर व्यवहार होऊ शकत नाहीत. कोणीही तारण कर्ज देण्यास तयार नाही. या अडचणींमुळे मालमत्ताधारक आर्थिक संकटात सापडले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

'त्यांना' मिळते नाले बंद केल्याची शिक्षा 
सावेडी उपनगरातील दसरेनगर, नित्यसेवा सोसायटी व वसंत टेकडी परिसरातून निघणारा नाला कुष्ठधाम, रासनेनगर, पाइपलाइन रस्तामार्गे सीना नदीला मिळतो. बऱ्याच ठिकाणी या नाल्याला पाइप टाकून भुयारी गटाराचे स्वरूप प्राप्त करून दिले गेले आहे. या पाइपवर शेकडो बंगले, इमारती व प्लॉट आहेत. पावसाचे पाणी नैसर्गिक उताराने वाहण्याचा प्रयत्न करते; मात्र या भागात नाले खुले नसल्याने व नाल्यांवरच घरे असल्याने प्रत्येक पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. नरहरीनगर भागाला या पुराचा सामना करावा लागतो. महापालिकेने नाल्यावर बांधकामाचे दिलेले परवाने नागरिकांसाठी समस्या ठरत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com