sakal
पारनेर: महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी, तसेच पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी मिळावा, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली. केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली. स्वदेश दर्शन २.० व प्रसाद योजनेअंतर्गत तसा प्रस्ताव खासदार लंके यांनी केंद्राला सादर केला.