

Energy Crisis Agitation: Locals Demand Daylight Electricity from MSEDCL
Sakal
महावितरण कार्यालयासमोर ‘ठिय्या’; किन्ही-बहिरोबावाडीला दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी
टाकळी ढोकेश्वर, ता. ३ ः पारनेर तालुक्यातील किन्ही, बहिरोबावाडी, तिखोल गावांमध्ये बिबट्यांचे हल्ले होत आहेत. सायंकाळी पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. यासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी शेतकरी नेते अनिल देठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी महावितरण उपाभियंता नंदीप देशमुख आंदोलक शेतकऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा करून पुढील आठवड्यापासून चार दिवस दिवसा व तीन दिवस रात्री वीजपुरवठा करण्याबाबत सहमती दर्शवली. शेतकऱ्यांनी ही यास मान्यता दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी दिलीप खोडदे, शिवाजी खोडदे, किरण पवार, संग्राम खोडदे, सचिन किनकर, यशवंत खोडदे, गोरक्ष खोडदे, तुषार व्यवहारे, मयूर व्यवहारे, वैभव गिरी, पांडुरंग व्यवहारे, राजेंद्र व्यवहारे, संतोष व्यवहारे, मच्छिंद्र खोडदे, जानकू साकुरे, शिवाजी आचार्य, अविनाश खोडदे, सुभाष मोढवे, विनोद खोडदे, सुनील खोडदे, जयसिंग खोडदे, राधाकृष्ण खोडदे, सौरभ खोडदे आदी उपस्थित होते.
किन्ही परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शेतकऱ्यांना रात्री, अपरात्री जीव धोक्यात घालून शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा मिळावा.
-अनिल देठे, शेतकरी नेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.