

Protesters hold dharna outside police station in Soneai; entire village observes bandh over youth assault case.
Sakal
सोनई : दहा दिवसांपूर्वी एका युवकास झालेल्या मारहाणीच्या घटनेत उपस्थित नसलेल्या युवकांवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू संघटना, व्यापारी असोसिएशनचे सदस्य व ग्रामस्थांनी सोनई पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. दादागिरी व खंडणी मागणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी व्यावसायिकांनी दुपारपर्यंत शंभर टक्के बंद पाळला. भरपावसात झालेल्या निषेध सभेला तीन हजारांहून अधिक युवक उपस्थित होते.