Leopard : महामार्ग बिबट्यांसाठी ठरला कर्दनकाळ! पाच वर्षांत रानगव्यासह चोवीस बिबट्यांचा मृत्यू

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग खऱ्या अर्थाने बिबट्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे.
Leopard
Leopardsakal
Updated on

- राजू नरवडे

संगमनेर - तालुक्यातून जाणारा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग खऱ्या अर्थाने बिबट्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. पाच वर्षांत जवळपास चोवीस बिबट्यांसह एका रान गव्याचा देखील मृत्यू झाला आहे. मात्र, अद्यापही बिबट्यांचे अपघात रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाला यश आले नाही. यामुळे महामार्ग ओलांडण्याच्या नादात आणखी किती बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांना आपले जीव गमवावे लागणार आहेत, असा प्रश्न देखील आता निर्माण झाला आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले आणि बिबट्यांच्या अपघातांची मालिका सुरू झाली आहे. कारण हे बिबटे अन्न-पाण्याच्या शोधात इकडून-तिकडे ये-जा करत असतात. मग कधी महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसते आणि यामध्ये बिबट्याचा मृत्यू होत आहे.

महामार्गावरील कऱ्हे घाट, चंदनापुरी, चंदनापुरी घाट, डोळासणे, माहुली घाट, आंबीखालसा फाटा परिसर, बोटा बाह्यवळण, माळवाडी या सर्व ठिकाणी सातत्याने बिबट्यांचे अपघात होऊन त्यांचे मृत्यू झाले आहे. त्यातच आता काही दिवसांपूर्वीच डोळासणे शिवारात महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत रानगव्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याचबरोबर तरसासह आदी वन्यप्राण्यांचे मृत्यू झाले आहे. सातत्याने महामार्गावर बिबट्यांचे अपघात होत आहे.

दरम्यान, दोन्ही बाजूंनी छोटी-मोठी वाहने भरधाव वेगाने ये-जा करत असतात. त्यातच हे अपघात होत असतात. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्ग खऱ्या अर्थाने बिबट्यांसाठी कर्दनकाळ ठरला असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले. त्यावेळेसच बिबट्यांचे अपघात होऊ नये म्हणून संबंधित विभागाने अगोदरच उपाययोजना करणे गरजेचे होते.

पण, याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत चौपदरीकरणाचे काम केले. मात्र, याचा मोठ्या प्रमाणात फटका वन्यप्राण्यांना बसत आहे. आजही सातत्याने अपघात होत आहेत. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच या भागात रानगवा आढळून आला होता. मात्र, त्याचाही महामार्गावर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बिबट्यांच्या संख्येबरोबर हल्लेही वाढले...

संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसा-ढवळ्या शेतकऱ्यांवर बिबटे हल्ले करू लागले आहे. सातत्याने बिबट्यांचे हल्ले वाढत चालले आहे. शेतकऱ्यांना शेतात काम करणे देखील अवघड झाले आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागले आहे. तर दुसरीकडे पिंजरा लावण्याची मागणी केल्यानंतर वनविभागाकडून पिंजराही लावला जात आहे. सातत्याने बिबटे जेरबंद देखील होत आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर २०२१ पासून आतापर्यंत अज्ञात वाहनांच्या धडकेत चोवीस बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत, तर एका रानगव्याचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान, महामार्ग ओलांडताना हे अपघात झाले आहेत. वाहनचालकांनी देखील वाहने चालवताना हळू चालवणे गरजेचे आहे, तर ज्या ठिकाणी बिबट प्रवण क्षेत्र आहे. त्या ठिकाणी महामार्गाच्या कडेला फलकही लावण्यात आले आहेत. जास्त जखमी झालेल्या बिबट्यांना औषधोपचारांसाठी नाशिकला देखील पाठवत आहे.

- सचिन लोंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी - भाग एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com