शाळेला जाण्याची जीवघेणी धडपड... ST बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल | MSRTC strike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Students educational loss due to MSRTC strike

शाळेला जाण्याची जीवघेणी धडपड... ST बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल

मिरजगाव (जि. अहमदनगर) : कोरोना (Corona) संकटात विस्कळित झालेली शैक्षणिक व्यवस्था दिवाळीनंतर विद्यालये- महाविद्यालये सुरू झाल्यानंतर पूर्वपदावर येण्याची अपेक्षा होती. कोरोना संकटात अनेक विद्यार्थी शाळेपासून वंचित होते. दिवाळीनंतर शाळा- महाविद्यालये सुरू झाल्याने ते पुन्हा शैक्षणिक प्रवाहात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातून मिरजगाव, कर्जत, राशीन अशा शहरांमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या शाळकरी मुलांना शाळेत पोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः मुलींना या संपाचा मोठा फटका बसला असून, त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

अनेक विद्यार्थ्यांवर पायपीट करण्याची वेळ

त्यातच दहावीच्या परीक्षेसह अनेक परीक्षांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने, मिळेल त्या वाहनाचा आधार घेऊन विद्यार्थी शाळेत पोचत आहेत. एसटी सेवा बंद असल्यामुळे आणि खासगी वाहतुकीची सोय वेळेवर नसल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. संपामुळे शाळांची पटसंख्या रोडावली आहे.

हेही वाचा: शिर्डीतील प्रसादालय उद्यापासून होणार सुरू

दुप्पट भाडे कसे परवडणार?

शाळेत पोचण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. खासगी वाहनचालकांकडून सध्या दुप्पट भाडे आकारले जाते. आधीच कोरोनामुळे आर्थिक फटका बसला असताना, हा आर्थिक भार परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत.

हेही वाचा: अहमदनगर : शहरातील अनधिकृत फ्लेक्‍स बोर्डने घेतला तरुणाचा बळी

loading image
go to top