
अहिल्यानगर: शहरातील एका व्यावसायिकाची दहा लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जबाजारी घर विकत घेतल्याचा प्रकार घराच्या लिलावानंतर उघडकीस आला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात संतोष कचरू साळुंके (रा. भूषणनगर, केडगाव) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश रामदास गोरे (वय ३७, रा. संदेशनगर, पाईपलाईन रोड) यांनी फिर्यादी दिली आहे.