esakal | कांदा चाळीचा रोहित पवारांमुळे सुटला वांदा...शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही झाले वर्ग

बोलून बातमी शोधा

The question of onion chali was solved due to Rohit Pawar

राज्य शासनाच्या 'राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत' कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदाचाळीची उभारणी केली होती. मात्र

कांदा चाळीचा रोहित पवारांमुळे सुटला वांदा...शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही झाले वर्ग
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्जत ः आमदार रोहित पवार यांनी निवडून आल्यापासून कामाचा झपाटा लावला आहे. शेतकरी, तरूण यांसह विविध क्षेत्रातील घटकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न त्यांनी मार्गी लावले. ही कर्जत-जामखेडकरांसाठी मोठी उपलब्धी आहे.

गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या कांदाचाळींचे अनुदान अखेर राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे.

हेही वाचा - प्राध्यापक मुलाची आत्महत्या, वडिलांनीही केलं असं

राज्य शासनाच्या 'राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत' कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदाचाळीची उभारणी केली होती.मात्र, दीड वर्षांपापासून कांदा चाळींच्या अनुदानाचे भिजत घोंगडे तसेच पडले होते. अनुदान मिळण्यास विलंब झाल्याने मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आपल्या अडचणींचा पाढा आ.रोहित पवारांपुढे वाचला.

शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेत आ.पवारांनी कांदाचाळीच्या रखडलेल्या अनुदानासंदर्भात थेट राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याशी पाठपुरावा केला. कृषी आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कर्जतचे कृषी अधिकारी दीपक सुपेकर, जामखेडचे कृषी अधिकारी सुधीर शिंदे आदींच्या प्रयत्नातून ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यामध्ये
अनुदान रखडलेल्या शेतकऱ्यांपैकी ८३ शेतकऱ्यांचे ८७,५०० रु.प्रमाणे ७२ लाख ६२ हजार ५०० रु. अनुदान मंजुर करुन आणले. अनुदानाची ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमाही करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्य व केंद्र सरकार आर्थिक संकटाचा सामना करीत आहे, असे असताना महाविकास आघाडीकडून सरकारकडुन शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
असे असले तरी आ. रोहित पवार हे आपल्या सततच्या पाठपुराव्याने आणि कौशल्याने मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यास यशस्वी ठरले आहेत. कमी कालावधीतच विविध योजनांमधुन खेचुन आणलेली मोठया रकमांची आकडेवारी कर्जत-जामखेडकरांना सुखावणारी आहे.

क्लिक करा - आमदार लंके यांनी फोडली शिवसेना

अनुदानाची वर्गवारी अशी
कर्जत तालुका
: ७२ लक्ष ६२ हजार ५०० रु.
जामखेड तालुका: १ कोटी १९ लक्ष ८७ हजार ५०९ रु.
कर्जत कांदाचाळ संख्या: ८३
जामखेड कांदाचाळ संख्या: १३७
कर्जत-जामखेड एकुण कांदाचाळ संख्या-२२०
मिळालेली एकुण रक्कम : १ काेटी ९२ लक्ष ५० हजार.
 

हमी भावासाठी प्रयत्न

कांदा चाळीच्या उभारणीसाठी प्रोत्साहन
उर्वरित शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदानही काही दिवसामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे. मतदारसंघातील कांदा उत्पादन हे दिवसेंदिवस वाढत अाहे. शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी होऊ नये, हमीभाव काळात वाटेल तेंव्हा त्यांना आपला माल विकता यावा यासाठी पुढील काळातही आणखी कांदा चाळींना प्रोत्साहन देणार अाहे. 

- रोहित पवार, आमदार कर्जत-जामखेड