श्रीरामपूर: जिल्ह्यातील सर्वच अतिक्रमित ओढे, नाले आणि चरांची मोजणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्यातही हीच कार्यवाही होणार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचा दिलासा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.