
अहिल्यानगर : समृद्ध शेती आणि संपन्न शेतकरी हे उद्दिष्ट समोर ठेवून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमधून शेतकऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातून राज्यातील अग्रगण्य जिल्हा म्हणून अहिल्यानगरची ओळख निर्माण करणार, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.