Ahmednagar News : दादांना फसविणारे जनतेलाही फसवतील; पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची नीलेश लंके यांच्यावर टीका

उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडत त्यांना फसविले. उद्या ते जनतेचीही साथ सोडतील. त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केलेले एक तरी मोठे काम दाखवा.
radhakrishna vikhe patil criticize nilesh lanke ncp crisis ajit pawar ahmednagar
radhakrishna vikhe patil criticize nilesh lanke ncp crisis ajit pawar ahmednagarSakal

अहमदनगर : ज्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडत त्यांना फसविले. उद्या ते जनतेचीही साथ सोडतील. त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केलेले एक तरी मोठे काम दाखवा. मगच एमआयडीसी आणण्याच्या गप्पा मारा, अशी टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नीलेश लंके यांच्यावर केली.

महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने आयोजित जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले,

राष्ट्रवादीचे प्रदेश युवा अध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे, राजेंद्र गुंड, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, संजय कोळगे आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, की जिल्ह्यातील तीन एमआयडीसींसाठी १७०० एकर जागा विनामूल्य देण्याचे महत्त्वाचे काम मी केले आहे. उद्योजक कारखानदारांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी सुपा एमआयडीसीमधील त्यांची गुंडगिरी संपवायची आहे. यासाठी महायुतीचे उमेदवार डॉ. विखेंना ऐतिहासिक मताधिक्याने निवडून आणणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी केले. दत्तात्रय पानसरे यांनी आभार मानले.

प्रवाहाच्या दिशेने जाणे योग्य

देशाच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी प्रवाहाच्या दिशेने जाणेच योग्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप बरोबर जाण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. खासदार डॉ. सुजय विखेंनी प्रत्येक तालुक्याचे प्रश्न समजून घेत ते लोकसभेत मांडून सोडविले आहेत याकडे आमदार संग्राम जगताप यांनी लक्ष वेधले.

डिपॉझिट जप्त होणार

गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात असलेल्या विखे कुटुंबाने आजपर्यंत एकाही व्यक्तीला त्रास दिला नाही. उलट जिल्ह्याच्या राजकारणात वैचारिकता जपत सुसंस्कृतपणा आणला. राष्ट्रवादीची ताकद माझ्यामागे उभी राहिल्यास समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार डॉ. विखे यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com