Radhakrishna Vikhe Patil: माझा डीएनए शेतकऱ्याचा: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील; उध्दव ठाकरेंचे शेतकऱ्यांसाठी योगदान काय ?

My DNA Belongs to Farmers: माझ्यावर टिका टिपणी करणारे उध्दव ठाकरे यांचे शेतकऱ्यांसाठी योगदान काय ? त्यांनी शेतकऱ्यांसाठी एखादा उद्योग उभारला का ? अशी टिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
Minister Radhakrishna Vikhe Patil addressing a gathering in Ahmednagar, asserting his strong farmer roots while questioning Uddhav Thackeray’s work for farmers.

Minister Radhakrishna Vikhe Patil addressing a gathering in Ahmednagar, asserting his strong farmer roots while questioning Uddhav Thackeray’s work for farmers.

Sakal

Updated on

शिर्डी: माझा डीएनए शेतकऱ्याचा आहे. माझे विधान ग्रामपंचायत आणि सहकारी सोसायटीच्या निवडणुकांसंदर्भात होते. कर्ज काढून निवडणुका लढवू नका. त्यातून ही मंडळी कर्जबाजारी होतात, अशा आशयाचे विधान मी केले. त्याचा विपर्यास करण्यात आला. त्यावरून माझ्यावर टिका टिपणी करणारे उध्दव ठाकरे यांचे शेतकऱ्यांसाठी योगदान काय ? त्यांनी शेतकऱ्यांसाठी एखादा उद्योग उभारला का ? अशी टिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com