
शिर्डी :‘‘मनोज जरांगे यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. समाजाच्या मागण्यांसाठी सरकार संवेदनशील आहे. हैदराबाद गॅझेटवर न्या. शिंदे समितीचा अभ्यास सुरू आहे. त्यांचा अहवाल येईपर्यंत जरांगे यांनी आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन राज्य सरकारच्यावतीने त्यांना करण्यात आले आहे,’’ अशी माहिती जलसंपदामंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.