प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी रहाणे, बनकर उपाध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडून सर्वांना संधी देण्याचे धोरण सत्ताधाऱ्यांनी घेतले आहे. त्यामुळे आम्ही या प्रक्रियेतून माघार घेतली.

नगर ः प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या अध्यक्षपदी राजू रहाणे, तर उपाध्यक्षपदी उषा बनकर यांची निवड झाली. 
जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली आज पदाधिकारी निवडीसाठी बैठक झाली.

अध्यक्षपदासाठी बापू तांबे गटातर्फे राजू रहाणे, तर रोहकले गटातर्फे संतोष अकोलकर यांनी अर्ज सादर केले होते. उपाध्यक्षपदासाठी तांबे गटाकडून अर्जुन शिरसाट, तर रोहकले गटाकडून संतोष अकोलकर यांचे अर्ज होते. मात्र, पुरेसे संख्याबळ नसल्याने रोहकले गटाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे रहाणे व बनकर यांची बिनविरोध निवड झाली.

निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा शिक्षक संघ, तथा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, सरचिटणीस विठ्ठल फुंदे, बाळासाहेब तापकीर, रामेश्वर चोपडे, राजकुमार साळवे, मच्छिंद्र लोखंडे, दत्ता कुलट, भाऊराव राहिंज, आर. टी. साबळे, बाळासाहेब चाबुकस्वार, बाळासाहेब सालके, संदीप मोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे आदी उपस्थित होते. 

प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे म्हणाले, ""दरमहा अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडून सर्वांना संधी देण्याचे धोरण सत्ताधाऱ्यांनी घेतले आहे. त्यामुळे आम्ही या प्रक्रियेतून माघार घेतली. आमचे सातही संचालक पदाधिकारी निवडीस उपस्थित होते; परंतु संख्याबळ नसल्याने अर्ज मागे घेतले. सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढाई सुरूच राहील. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahane as Chairman of Primary Teachers Bank, Bankar Vice Chairman