बीजमाता राहीबाई पोपेरे यांची केंद्र सरकारच्या समितीवर निवड

Nun Popere elected to Central Government Committee
Nun Popere elected to Central Government Committee

अकोले : बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांची, केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या प्रोटेक्‍शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राइट ऍक्‍ट 1012 अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील निवड समितीवर निवड करण्यात आली आहे, अशी माहिती "बायफ'चे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी दिली. 

समितीचे रजिस्ट्रार डॉ. टी. के. नागरत्ना यांनी निवडीचे पत्र पोपेरे यांना पाठविले आहे. या समितीमार्फत देशपातळीवर पारंपरिक बियाणेसंवर्धन, निर्मिती, संगोपन व प्रचार-प्रसार करणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळे व समित्यांची निवड राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी करण्यात येते.

देशपातळीवर दर वर्षी सुमारे 85 लाख रुपयांचे पुरस्कार या समितीच्या माध्यमातून देण्यात येतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अकोले तालुक्‍याचे नाव नेणाऱ्या पोपेरे यांची या समितीवर निवड होणे म्हणजे तळागाळात काम करणाऱ्या गरीब हातांना मिळालेला न्याय आहे, अशी भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com