
राहुरी : शहरातील वर्धमान ज्वेलर्समध्ये ६० लाख ४५ हजारांचे सोने व चांदीचे दागिने, तसेच ‘सीसीटीव्ही’चा डीव्हीआर चोरीच्या प्रकरणातील सराईत दोन गुन्हेगारांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. पैकी एका जणाच्या विरोधात विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल ९२ गुन्हे दाखल आहेत. त्यांनी पोलिस कोठडीत गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीच्या मालापैकी चार लाख ९५ हजार २६९ रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.