
राहुरी : राहुरी शहर हद्दीत शाहूनगर वसाहतीत बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी केली. सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बाळासाहेब धोंडे व पुष्पा धोंडे (रा. शाहूनगर, राहुरी बुद्रुक) हे दाम्पत्य घराला कुलूप लावून सोमवारी (ता. २१) सकाळी साडेनऊ वाजता शेतात कामासाठी गेले होते.