esakal | मोटारसायकल चोरीला गेलीय, सेटलमेंट करा मिळून जाईल...राहुरी पोलिसांचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Rahuri joins police thieves

"बारागाव नांदूर येथे मंगळवारी (ता. ४) मध्यरात्री दीड वाजता बाचकर वस्तीवर दुचाकी चोराला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला (बुधवारी) सकाळी पोलिसांच्या हवाली केले. जेलमधील कैद्यांना कोरोना आढळला. या कारणाने पोलीस ठाण्यातून दुचाकी चोराला तासाभरात सोडून दिले.

मोटारसायकल चोरीला गेलीय, सेटलमेंट करा मिळून जाईल...राहुरी पोलिसांचा सल्ला

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : माझ्या दुचाकीची चोरी झाली.  "दुचाकी सोडवायची, की मुळा धरणात सडवायची."  मध्यस्थाचा धमकीवजा निरोप आला. खंडणी ठरली.  दुचाकी सुटली. पण हे कुठवर सहन करायचं. कोरोना परिस्थितीत चोरांना द्यायला कुठून पैसे आणायचे. राहुरीची गुन्हेगारी बिहार पेक्षा घातक वळणावर आहे. आज दुचाकीला खंडणी दिली. उद्या आमची लहान मुले उचलून नेतील. त्यांना सोडायला खंडणी द्यावी लागेल.  अशी उद्विग्न प्रतिक्रिया पिडीत विशाल वराळे यांनी व्यक्त केली. 

'सकाळ' शी बोलतांना वराळे म्हणाले, "मागील महिनाभरात आमच्या परिसरातील पाच-सहा दुचाकी चोऱ्या झाल्या. माझी दुचाकी मध्यरात्री घरासमोरून चोरली. राहुरी पोलीस ठाण्यात गेल्यावर "गुन्हा नोंदवू नका. चार-पाच दिवसात निरोप येईल. वाट पहा." असा सल्ला मिळाला.

हेही वाचा - पारनेरसाठी हे अनुदान झाले वर्ग

पाच दिवसांनी मध्यस्थाचा निरोप आला. "गुन्हा नोंदवला. तर, दुचाकी मिळणार नाही. दुचाकी मिळवायची. की, मुळा धरणात सडवायची. तुंम्ही ठरवा." सहा हजार मागितले. पाच हजार खंडणीची तडजोड झाली. दुचाकी मिळाली. हा पायंडा पडत चाललाय. सामान्य माणसाने प्रतिकार कसा करायचा."

"बारागाव नांदूर येथे मंगळवारी (ता. ४) मध्यरात्री दीड वाजता बाचकर वस्तीवर दुचाकी चोराला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला (बुधवारी) सकाळी पोलिसांच्या हवाली केले. जेलमधील कैद्यांना कोरोना आढळला. या कारणाने पोलीस ठाण्यातून दुचाकी चोराला तासाभरात सोडून दिले. ज्यांनी चोराला पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यांना चोराच्या साथीदारांनी पोलीस ठाण्यासमोर धमकावले. एवढी गुन्हेगारांची दहशत वाढली आहे. किती त्रास सहन करायचा." असे प्रश्न वराळे यांनी उपस्थित केले.

पांडुरंग कोळसे (रा. गुहा) म्हणाले, "शेतातील पिकांना पाणी देतांना बांधावर लावलेली दुचाकी २६ जून रोजी चोरी झाली. पोलीस ठाण्यात आठ दिवस चकरा मारुन गुन्हा नोंदविला नाही. सुरेश वाबळे यांनी सांगितल्यावर गुन्ह्याची नोंद झाली. परंतु, अद्याप स्पॉट पंचनामा झाला नाही. तर, दुचाकीचा तपास कधी सुरू होणार. 'सकाळ' ने आमचा प्रश्न मांडला. ऐरणीवर आणला. माझी दुचाकी मिळेल. किंवा मिळणार नाही.  परंतु, 'सकाळ' मुळे आमची ससेहोलपट समाजासमोर आली."

बापूसाहेबांनी खडसावताच झाले सरळ

"राहुरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद घेण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यावर 'सकाळ'ने वाचा फोडली. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर आगपाखड केली. त्यामुळे, गुन्ह्यांची विनासायास नोंद होऊ लागली आहे. काल (रविवारी) देसवंडी व पाथरे येथे दुचाकी चोरीचे दोन गुन्हे राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झाले.