Rahuri Crime
Sakal
अहिल्यानगर
Rahuri Crime: 'राहुरीत पोलिसांकडून अवैध दारुसाठा जप्त'; कारचालक आरोपीला घेतले ताब्यात
illegal liquor Rahuri: कारचालकाने विचारपूस करताना समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. आरोपी अवैध दारू विक्री व तस्करीच्या रॅकेटशी जोडलेला असल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आहे. जप्त केलेल्या दारुसाठ्याची किंमतही लक्षणीय असल्याचे समजते.
राहुरी : शहरात रविवारी सायंकाळी विनापरवाना दारूची वाहतूक करणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. अडीच लाखांची कार आणि ६८०० रुपयांच्या दारूच्या बाटल्या असा एकूण २ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी कारचालक आरोपीला ताब्यात घेतले आहे.
