

Rahuri police arrested three suspects in a dumper theft case; accused remanded to police custody till Tuesday.
Sakal
राहुरी : तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरून नेलेला डंपर अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी शोधून काढला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागने (एलसीबी) या प्रकरणातील तिघा आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. राहुरी न्यायालयाने तिन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत (ता.११) पोलिस कोठडी सुनावली आहे.