
राहुरी: राहुरी पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आउट’ची मोठी कारवाई केली. त्यात, अजामीनपात्र वॉरंटमधील दहा जण, विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणारे तीन जण, तसेच दुचाकीवरील संशयित एक जण अशा एकूण १४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.