esakal | म्हणजे न्याय निवाडा सुद्धा अवैध धंद्यांच्या ठिकाणीच
sakal

बोलून बातमी शोधा

In Rahuri taluka due to the negligence of the police, theft and illegal trade increased

राहुरी तालुक्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात यावी.

म्हणजे न्याय निवाडा सुद्धा अवैध धंद्यांच्या ठिकाणीच

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : तालुक्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात यावी.  कायद्याचे रक्षकच भक्षक झालेत. त्यामुळे वाढलेले अवैद्य धंदे, दुचाकी चोऱ्या बंद व्हाव्यात. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात. सामान्य जनतेला न्यायासाठी अवैध धंदेवाल्यांचे नव्हे तर पोलिसांचे संरक्षण मिळावे, कायद्याचा धाक निर्माण व्हावा. गुन्हेगारांवर पोलिस खात्याचा वचक निर्माण व्हावा. जनतेला निर्भयपणे जीवन जगता यावे, अशा एकना अनेक अपेक्षा जनतेतून व्यक्त झाल्या.

राहुरी तालुक्यात फोफालेली गुन्हेगारी, अवैध धंदे, दुचाकी चोर्‍यांच्या विरुद्ध 'सकाळ' ने निर्भिडपणे वाचा फोडली. त्यासाठी ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पुढाकार घेतला. यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा कौतुकाचा वर्षाव झाला. कार्यक्षम पोलिस, डॉक्टर, वकील, अभियंते यांनी सोशल मीडियातून व फोनद्वारे भावना व्यक्त केल्या.

गणेश वराळे म्हणाले, "वरळी वस्ती, काळे आखाडा, मोमीन आखाडा, नांदूर रस्ता या भागात दररोज दुचाकी चोऱ्या होत आहेत. पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद केले जात नाही. विशाल वराळे यांनी दुचाकी चोराला सहा हजार रुपये दिले. त्यांना राहुरी बस स्थानकाजवळ दुचाकी परत मिळाली. पंकज वराळे यांची दुचाकी (एमएच १७ - ९७९५) पंधरा दिवसांपूर्वी घरासमोरून चोरीला गेली. ती अद्याप सापडली नाही. दुचाकी चोऱ्या रोखण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत आहे."

सामाजिक कार्यकर्ते रमेश साबळे म्हणाले, "राहुरी पोलिस ठाण्यात एजंट व दलालांचा सुळसुळाट आहे. ते सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात. राहुल कायदा व सुव्यवस्थेबद्दल जनतेचा भ्रमनिराश झाला आहे.  मोबाईल चोरी, पाकीटमारी, मोटारसायकल चोरी, घरफोडी नित्याचे झाले आहे. अवैध धंदे फोफावले आहेत. गावाकडील एखादी तक्रार निवारण करायची असेल. तर गावांमध्ये ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय चालतात. त्या ठिकाणाहून लोकांना निरोप पाठविला जातो. या ठिकाणी आम्हाला येऊन भेटा. तुम्हाला बोलावणे आहे. म्हणजे न्याय निवाडा सुद्धा अवैध धंद्यांच्या ठिकाणी होत आहे."

भाऊसाहेब खेवरे म्हणाले, "पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना हटविल्याशिवाय तालुक्यातील गुन्हेगारी नियंत्रणात येऊ शकत नाही." शहरातील प्रख्यात डॉक्टर, वकीलांनी फोन करून, आपबिती सांगितली. 'सकाळ' च्या वार्तांकनाचे कौतुक केले.  राहुरी पोलिस ठाण्यावर जनतेचा आक्रोश मोर्चा काढण्याची तयारी काही सामाजिक संघटनांनी केली आहे. कोरोना परिस्थितीत जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश लागू आहे. परंतु, कायद्याच्या रक्षणासाठी प्रसंगी कायद्याचे उल्लंघन करण्याची तयारी असल्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांनी राहुरीतील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करण्यासाठी तातडीने हालचाली केल्या नाहीत. तर, जनतेचा रोष वाढून, कोरोना परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था आणखी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image