

Radhakrishna Vikhe Patil announcing the upcoming installation of Chhatrapati Shivaji Maharaj’s statue in Rahuri.
Sakal
राहुरी : राहुरीकरांसाठी ऐतिहासिक क्षण जवळ येत आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी १ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हा पुतळा राहुरीच्या अभिमान, संस्कृती व इतिहासाचा गौरव पुन्हा उजळवणारा ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहुरी येथे काल (रविवारी) सायंकाळी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या प्रचाराच्या सांगता सभेत मंत्री विखे पाटील बोलत होते.