
IMD issues yellow alert: Rain likely in Ahilyanagar district for next five days.
esakal
अहिल्यानगर: भारतीय हवामान खात्याने ११ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.