esakal | ‘भाजपला देश चालवता येत नाही; महागाईला केंद्र सरकारच जबाबदार’
sakal

बोलून बातमी शोधा

‘भाजपला देश चालवता येत नाही; महागाईला केंद्र सरकारच जबाबदार’

‘भाजपला देश चालवता येत नाही; महागाईला केंद्र सरकारच जबाबदार’

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : इंधनापासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीने महागाईचा उच्चांक गाठला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेची कुठलीही चिंता वाटत नाही. यावरून भाजपला देश चालवता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा आरोप छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पत्रकार परिषदेत केला. (Bjp-central-government-is-responsible-for-inflation-Chhattisgarh-Chief-Minister-Bhupesh-Baghel-Prime-Minister-Narendra-Modi-nad86)

दिल्लीत भाजपची सत्ता असली तर त्यांचा मेंदू असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात आहे. त्यामुळे येथे येऊन आपण पत्रकार परिषद घेत असल्याचे बघेल यांनी स्पष्ट केले. भाजपच्या सात वर्षांच्या कार्यकाळात कधी नव्हे तेवढी अर्थव्यवस्थेत १० टक्क्यांनी घट झाली आहे. मागील चाळीस वर्षांत हे झाले नव्हते. पेट्रोल २६, डिझेल ४२, खाद्य तेल ३५.९४, फळे २१, कांदे २३, डाळी १२ तर किराणा दरात सरासरी ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा: भाजपशी जवळीक असलेला ओबीसी चेहरा राष्ट्रवादीच्या गळाला

कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेने महागाईचा दर दोन ते सहा टक्के वाढेल असा अंदाज वर्तविला होता. मात्र, भाजपच्या धोरणामुळे तो त्याहीपेक्षा वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. याची साधी दखलही मोदी सरकार घेत नसल्याचे बघेल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, महासचिव विशाल मुत्तेमवार, प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

नोटाबंदीवर मत का मागत नाही

नोटाबंदी आणि जीएसटीचे समर्थन करणारी भाजप निवडणुकीच्या वेळी मात्र भावनिक मुद्दे उपस्थित करते. हे निर्णय लोकहिताचे आहेत असा दावा सरकारचा असेल तर या मुद्यावर मत का मागत नाही असा सवाल बघेल यांनी केला.

इडी फक्त गैरभाजप राज्यात

इडी, सीबीआय या स्वायत्त संस्थेचा गैरवापर केंद्र सरकार करीत आहे. या दोन्ही संस्था फक्त गैरभाजप राज्यांमध्ये कारवाई करतात. भाजप शासित राज्यांमध्ये त्यांना कुठलेच घोटाळे दिसत नाही.

हेही वाचा: लग्नघरातच संपूर्ण कुटुंबाचा अंत; हळदही न निघालेल्या दाम्पत्याचाही मृत्यू

कुठे आहे वन नेशन व वन टॅक्स?

जीएसटीची अंमलबजावणी करताना मोदी यांनी वन नेशन वन टॅक्स अशी घोषणा केली होती. मात्र, इंधन, पेट्रोल, डिझेलला सोयीस्करपणे त्यातून वगळले. एवढेच नव्हे तर आता पेट्रोल-डिझेलवर आणखी चार टक्के सेस आकारून सरकारने महागाईला आणखी खतपाणी घातल्याचे बघेल म्हणाले.

(Bjp-central-government-is-responsible-for-inflation-Chhattisgarh-Chief-Minister-Bhupesh-Baghel-Prime-Minister-Narendra-Modi-nad86)

loading image