esakal | नाहीतर ही जनता ह्या सरकारचा अंत केल्या शिवाय राहणार नाही - मनसे
sakal

बोलून बातमी शोधा

Raj and Uddhav thackeray

नाहीतर ही जनता ह्या सरकारचा अंत केल्या शिवाय राहणार नाही - मनसे

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत (Mumbai) कोरोनाची स्थिती (corona situation) आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. रुग्णवाढही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. पण अजूनही सरकारने निर्बंध (govt restriction) शिथील केलेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनता, व्यापारी (traders) सर्वांमध्ये सरकार विरोधात नाराजीची भावना आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येईल, अशी भीती वारंवार दाखवली जात आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि व्यापारी वर्ग जाहीरपणे आपल्या मनातील खदखद व्यक्त करत आहे. पण अजूनही निर्बंध शिथील करण्याच्या दृष्टीने कुठलीही पावलं उचलण्यात आलेली नाहीत. (otherwise Publick will finish this govt mns dmp82)

उलट लोकल इतक्यात सुरु होणार नाही, असं सरकारी सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं जातय. त्यामुळे नागरिकांच्या असंतोषामध्ये भर पडतेय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे मागच्या काही दिवसांपासून सातत्याने सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. आर्थिक दृष्टीने विचार करुन, पूर्णपणे अनलॉकची मागणी करत आहेत. "सरकारने लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये नाहीतर ही जनता ह्या सरकारचा अंत केल्या शिवाय राहणार नाही" असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: इंधन दरवाढीविरोधात आंदोलन म्हणजे नौटंकी- देवेंद्र फडणवीस

सरकारने पहिल्या दोन लेव्हल काढून टाकल्या आहेत. मुंबई सुरुवातीपासूनच लेव्हल तीन मध्येच आहे. त्यामुळे मुंबईत व्यापाऱ्यांना फक्त दुपारी चार पर्यंतच दुकानं खुली ठेवण्याची परवानगी आहे. सरकारच्या या भूमिकामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे.

हेही वाचा: शरद पवार राष्ट्रपती होणार? राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दिलं उत्तर

लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. लोकल सुरु करण्यासाठी प्रवासी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. स्वत: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लोकल सुरु करण्याबद्दल पत्र लिहिलं. लोकलवर बऱ्याच लोकांचे रोजगार अवलंबून आहेत. लोक सध्या प्रवासात हाल सहन करुन नोकरीचं आपलं ठिकाण गाठत आहेत. लवकर सर्वकाही अनलॉक व्हावं हीच जनतेची मागणी आहे.

loading image