

Devotees Shower Flowers During Vibrant Datta Jayanti Procession in Rashin
Sakal
राशीन : पुष्पमाला, नारळ आणि केळीच्या पानांची केलेली आरास, त्यात दत्तमंदिरासमोर सजलेला पाळणा, रंगीबेरंगी पताका आणि विजेची रोषणाई, वैष्णवजणांकडून होणारा ‘दिगंबरा.. दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा गजर...सोबतीला टाळ-मृदंगाची साथ आणि भाविकांकडून झालेला पुष्पवर्षाव, अशा भक्तिमय वातावरणात गुरुवारी (ता.४) दत्तजन्म सोहळा जगदंबा मंदिरासह राशीनसह परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.