रेशनच्या धान्याचा सुरु असलेला उलटा प्रवास पोलिसांनी पकडला

शांताराम काळे
Monday, 14 September 2020

राजुरहून संगमनेरकडे स्वस्थ धान्य घेऊन जाणारी साडेबारा टनची ट्रक अकोले पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी सापळा लावून पकडली.

अकोले (अहमदनगर) : राजुरहून संगमनेरकडे स्वस्थ धान्य घेऊन जाणारी साडेबारा टनची ट्रक अकोले पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी सापळा लावून पकडली. यात गोरगरिबांना वाटण्यात येणारे स्वस्थ धान्य असल्याने याबाबत उलट- सुलट चर्चा सुरू आहे. 

पोलिस निरीक्षक जोंधळे म्हणाले, आम्ही ट्रक पकडली असून तहसीलदार यांचेकडे अहवाल पाठविला आहे. तर तहसीलदार मुकेश कांबळे यांनी स्वस्थ धान्य निरीक्षक यांना संबधित ठिकाणी पाठविले असून तपासाअंती कारवाई होईल, असे सांगितले आहे. मात्र साडेबारा टनची स्वस्थ धान्य असलेली गाडी उलट प्रवास कशी करत होती. यामागे मोठे रॅकेट असून हे प्रकरण दबण्यासाठी मोठ्या जोरदार हलचाली सुरू आहेत. गोरगरिबांच्या तोंडातील धान्य असे काळाबाजारामध्ये नेण्यात येत असेल तर याची चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी

बहुजन पक्षाचे संघटक संतोष शेंद्रे यांनी मुख्यमंत्री विरोधीपक्षनेते यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. मात्र हा प्रवास अनेक दिवसापासून सुरू असून अधिकारी वर्ग या प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा पाठीशी घालत आहेत. याची चौकशी लोकप्रतनिधिनी करावी, असे संतोष शेंद्रे म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ration grain truck stolen in Akole taluka