esakal | झारीतील शुक्राचार्य कोण? निवेदन देऊनही मिळेना स्वस्त धान्य
sakal

बोलून बातमी शोधा

Ration shopkeeper statement to tehsildar in Akole taluka

ऐन दिवाळीत गरीब आदिवासी, मागास, वंचित, शोषित, अंध, अपंग, विधवा, मजूर याना रेशनचे धान्य व साखर मिळाली नसल्याने त्याची दिवाळी कडूच गेली. मात्र त्यांना रेशन मिळाले नाही.

झारीतील शुक्राचार्य कोण? निवेदन देऊनही मिळेना स्वस्त धान्य

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : तालुक्यात ऐन दिवाळीत गरीब आदिवासी, मागास, वंचित, शोषित, अंध, अपंग, विधवा, मजूर याना रेशनचे धान्य व साखर मिळाली नसल्याने त्याची दिवाळी कडूच गेली. मात्र त्यांना रेशन मिळाले नाही. हे दस्तूर खुद्द 40 रेशन पुरवठादार यांनीच तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन सांगीतले आहे.

त्यामुळे झारीतील शुक्राचार्य कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे. नियोजनाचा अभाव, वाहतूक ठेकेदार पुढारी असल्याने ‘हम करोसे कायदा’ या उक्तीप्रमाणे सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
अकोले तालुका अतिदुर्गम त्यात कोरोना महामारीमुळे, रोजगार नाही मजुरी नसल्याने हातात सणासुदीला पैसे नाही. कुणी मजुरी देत नाही अशा वेळी महागाचे धान्य, साखर घेणे परवडत नाही. त्यात सरकारी धान्य स्वस्थ दारात मिळेल म्हणून रेशनची वाट पाहणारी दारिद्र्य रेषेखाली माणसे दिवाळीत वाट पाहून थकली. मात्र धान्य मिळाले नाही. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मजूर, कष्टकरी आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना बसला आहे.

शिधापत्रिका नसल्याने अनेकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य दिले जात नाही. त्यामुळे शिधापत्रिका नसणाऱ्यांनाही धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले असूनही त्याची अमल बजावणी होत नसतानाच चित्र आहे. पेठेवाडी ग्रामस्थांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्या माध्यमातून तहसीलदार कचेरीवर ठिय्या आंदोलन केल्यावर त्यांना धान्य मिळाले. 

मग प्रत्येक गावांनी मोर्चे काढायचे का? तर कुमशेत, केळुंगण, एकदरे, शेरणखेल, कोलतेंभे, चंदगीरवाडी, शेंडी, साकीरवाडी, शेलविहिरे शिंगणवाडी, आंबाडा, लावीत, डोंगरगाव, देवठाण आदी 40 गावात रेशन पोचलेच नाही. त्यामुळे रेशनधारकांना धान्य उपलब्ध झाले नसल्याचे अकोले तालुका स्वस्थ धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणपत भांगरे, बन्सी अस्वले, भास्कर बुळे, मुरलीधर सुपे आदी चाळीस दुकानदारांनी लेखी निवेदनाद्वारे सांगितले आहे. 

रात्रीच्या वेळी वाहतूक करू नये असे निर्देश असताना वाहतूक रात्री बेरात्री केली जाते वाहतूक ठेका पुढारी माणसांकडे असल्याने यात मोठा गोंधळ असल्याची चर्चा आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image