Pravin Chaydhary and Pranali Chaydhary
sakal
सोनई - कोरोना महामारीच्या संकटात हजारोंच्या मदतीला धावून गेलेले पती 'म्युकरमायकोसिस' होऊन अंथरुणावर पडले. पत्नीने सत्यवानाला यमाकडून परत आणणा-या सावित्रीप्रमाणेच परिस्थितीपुढे हतबल न होता अंधत्व आलेल्या पतीची पाच वर्षांपासून ''काठी'' होत आधार झाली. आजही पतीची सेवा करून कुटुंबाच्या उन्नतीसाठी या सावित्रीचा संघर्ष सुरूच आहे.