
राहता: महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक सेमी इंग्लिश गुरुकुल विद्यालयातील एकाचवेळी ३०० विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याची विक्रमी कामगिरी केली. त्यात राज्य गुणवत्ता यादीत पाच विद्यार्थी, जिल्हा गुणवत्ता यादीत चार विद्यार्थी, विशेष प्रावीण्यात १४ विद्यार्थी, तालुका गुणवत्ता यादीत २१ विद्यार्थी, उत्तेजनार्थ गुणवत्ता यादीत १३ विद्यार्थी, तर प्रमाणपत्रासाठी २४३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.