थोरात साखर कारखान्याचे विक्रमी डिस्टलरी उत्पादन

आनंद गायकवाड
Sunday, 13 December 2020

साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थ निर्मिती म्हणून या कारखान्याने 1984 मध्ये डिस्टिलरी प्रकल्पाची उभारणी केली. 40 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या अल्कोहल प्रकल्पाचे 2019 मध्ये आधुनिकीकरण करून मल्टीप्रेशर कॉपर कॉलमसह 40 हजार लिटरचा प्रकल्प सुरु केला.

संगमनेर ः येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने गुणवत्तेबरोबरच उपपदार्थ निर्मितीतील डिस्टिलरी प्रकल्पातून एका दिवसात 58 हजार 300 लिटरचे उच्चांकी उत्पादन करून कारखान्याच्या कार्यक्षमतेत आणखी एक मानाचा तुरा रोवल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली.

ओहोळ म्हणाले की, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने इतर कारखान्यासाठी कायम दिशादर्शक काम केले.

साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थ निर्मिती म्हणून या कारखान्याने 1984 मध्ये डिस्टिलरी प्रकल्पाची उभारणी केली. 40 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या अल्कोहल प्रकल्पाचे 2019 मध्ये आधुनिकीकरण करून मल्टीप्रेशर कॉपर कॉलमसह 40 हजार लिटरचा प्रकल्प सुरु केला.

हेही वाचा - आमदार बबनराव पाचपुते यांना कोरोनाची बाधा

या प्रकल्पातून एका दिवसात 58 हजार 300 लिटरचे उच्चांकी अल्कोहोल उत्पादन घेतले. कारखान्याने चालू हंगामात आतापर्यंत तीन लाख 57 हजार 500 मेट्रिक टन उसाचे गाळप केले. वीज प्रकल्पातून आतापर्यंत एक कोटी 86 लाख 17 हजार 400 युनिट वीज निर्यात करून 12 कोटी 85 लाखांचे उत्पादन मिळवले.

चालू हंगामात या कारखान्याने 49 दिवसात चांगले उत्पादन व वीज निर्मिती केली. सभासद व शेतकऱ्यांचे हित जपताना एक रकमी एफआरपीसह उच्चांकी भाव दिला. महसूल मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात कारखान्याने नवीन 5 हजार 500 मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना व तीस मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प विनाअडथळा कार्यान्वित झाला हा प्रकल्प संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record distillery production of Thorat Sugar Factory