MLA Monika Rajale announces ₹208 crore relief for rain-affected farmers; funds to reach accounts before Diwali.
अहिल्यानगर
MLA Monica Rajale: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २०८ कोटी मंजूर: आमदार मोनिका राजळे; दिवाळीपूर्वी रक्कम खात्यात वर्ग होणार
Financial Relief for Farmers Hit by Rain Damage: महायुती शासनाने दिलेला शब्द पाळून भरपाईच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी ८४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यामध्ये २५ टक्के रक्कम ही पाथर्डी व शेवगाव तालुक्यासाठी मंजूर केली आहे.
पाथर्डी: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील एक लाख ८५ हजार शेतकऱ्यांना २०८ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

