
अहिल्यानगर: शहरातील धार्मिक स्थळाची तोडफोड केल्याप्रकरणी अटक आरोपींना न्यायालयाने २८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बबलू रामभाऊ पाल (वय ३६, जेसीबी चालक, रा. बोरुडे मळा. भुतकरवाडी, अहिल्यानगर), योगेश सखाराम झोंड (वय २४, सुपरवायझर, रा. धोंडेवाडी रोड, वाळकी, ता. जि. अहिल्यानगर) व अरुण गोविंद खरात (वय २०, जेसीबी मालक, रा. सावेडी, अहिल्यानगर) अशी या आरोपींची नावे आहेत. शहरातील गांधी मैदान ते पटवर्धन चौक रस्त्यावरील एका धार्मिक स्थळाची आरोपींनी तोडफोड केली.