
अहिल्यानगर: गांधी मैदान ते पटवर्धन चौक रस्त्यावरील एका धार्मिक स्थळाच्या तोडफोड प्रकरणातील दोघा समाजकंटकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. उर्वरीत सहा संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींनी रविवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास धार्मिक स्थळाची तोडफोड केली होती. दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजबांधवांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविला.