औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासाठी प्रजाकसत्ताकदिनाची डेडलाईन

गौरव साळुंके
Sunday, 10 January 2021

येथील एसटी बस स्थानकातील औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसेसवर नुकतेच छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक लावण्यात आले.

श्रीरामपूर ः शिर्डी येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसेसवर येथे छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक लावून औरंगाबादचे शहराचे 26 जानेवारीपर्यंत छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्याची मागणी येथील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.

अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी फलकबाजी करीत घोषणाबाजी दिल्या. 26 जानेवारीपर्यंत औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी मनसेच्या आंदोलनकांनी केली आहे.

हेही वाचा - विधवा भावजयीसोबत दिराने केले लग्न

येथील एसटी बस स्थानकातील औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसेसवर नुकतेच छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक लावण्यात आले. तसेच औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचाही मनसेने तीव्र निषेध केला आहे.

आगामी 26 जानेवारीपर्यंत औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्ह्याभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जिल्हाधक्ष शिंदे यांनी दिला आहे. 

महाआघाडी सरकारने औरंगाबाद महानगरपालिका येथील सत्ताधारयांची नोंद घेण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, शहराध्यक्ष गणेश दिवसे, विशाल शिरसाठ, निलेश सोनवणे, गोरक्षनाथ येळे, रोहित जोंजाळ, भास्कर सरोदे, नंदू गंगावणे उपस्थित होते.
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic Day deadline for Sambhajinagar of Aurangabad