पेन्शनच्या रकमेसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण

hunger-strike
hunger-strikeesakal

श्रीरामपूर, (जि. अहमदनगर) : येथील नगरपालिकेसमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण करुन पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. पालिकेने सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सातव्या वेतन अयोगानुसार (7th pay commission) थकीत रक्कमेचा फरक, उपदान, रजावेतन, कालबध्द पदोन्नतीचा फरक तसेच वेतन फरकाची रक्कम त्वरीत देण्याची मागणी आंदोलकांनी उपोषणाद्वारे केली.

उपोषण करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन लवकरात लवकर न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान, पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सेवाकार्यातून अनेक वर्षांपासून सेवानिवृत्त झाले आहे. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार उपदान फरक, रजावेतन फरक, पेन्शन फरक, वेतन फरक, कालबध्द पदोन्नतीचा उपदान, रजा, पेन्शन फरकाच्या थकीत रकमा अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे उपोषण करुन पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सेवानिवृत्त कर्मचार्यांनी केला.

hunger-strike
अकोले : किसान सभेचा सोयाबीन ओतून केंद्र सरकारचा केला निषेध

येथील नगरपालिकेने शंभराहुन अधिक सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना दोन महिने उशिराने सातव्या वेतन आयोग लागू केला आहे. सदर दोन महिन्यांचा फरकाची रक्कम तात्काळ देण्याची मागणी उपोषणकर्ते यशवंत देवधर, प्रभाकर शिंदे, ज्ञानेश्‍वर चव्हाण, अशोक प्रधान, रावसाहेब काळे, आंद्रेस थोरात, अंकुश प्रधान, आर. एम. अपील, आनंदा गायकवाड, लक्ष्मण जोगदंड, अशोक गायकवाड, नाना शेळके, श्रीपाद बिंदीकर, अनिल काजळे, रंगनाथ झरेकर यांनी केली. नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून वरील मागण्याचे निवेदन स्विकारले.

hunger-strike
दूध उत्पादकांची दिवाळी होणार गोड; 'राजहंस'कडून मोठ्या घोषणेची शक्यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com