

Return rains flood Mhalas Pimpalgav Chanda, washing away roads and disrupting local life.
Sakal
चांदे: म्हाळस पिंपळगाव ते चांदा रस्त्यावरील (ता. नेवासे) डांबरी रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेला. सध्या परतीच्या पावसाने म्हाळस पिंपळगाव चांदा परिसरामध्ये हाहाकार चालवला त्यामुळे अनेक ओढ्या-नाल्यांना पूर आला. अनेक गावांचा संपर्क या पावसामुळे तुटला.