तहसीलदारांचा चढता पारा, वाळू तस्करांचे वाजले बारा...

The revenue department seized vehicles carrying illegal vehicles
The revenue department seized vehicles carrying illegal vehicles

शेवगाव  : महसूल विभागाने मागील १५ दिवसांत वाळू, खडी व मुरमाची अवैध वाहतूक करणारी १४ वाहने ताब्यात घेतली. त्यांच्यावर कारवाई करीत २६ लाख ६३ हजार ६५० रुपये दंड ठोठावला. त्यातील ९ वाहनांकडून १३ लाख ७८ हजार ९५० रुपये दंड वसूल केल्याची माहिती तहसीलदार अर्चना भाकड यांनी दिली. 

गेली दोन महिने कोरोनाबाबत खबरदारी आणि उपाययोजनांत प्रशासन व्यस्त होते. महसूल विभागात प्रभारीराज सुरू असल्याने तालुक्‍यात वाळू, खडी, मुरूम आणि मातीचा बेसुमार उपसा सुरू होता. दरम्यानच्या काळात येथे तहसीलदार भाकड यांची बदली झाली. त्यांनी तालुक्‍यातील वाळूसह इतर गौण खनिजचोरी करणाऱ्यांची माहिती संकलित केली. तालुक्‍यातील नदी, नाले व ओढ्यांची पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणात वाळू व मुरमाची चोरी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी कारवाईचे धडक सत्र राबविण्यास सुरवात केली. 

गेल्या १५ दिवसांत विनापरवाना वाळूवाहतूक करणाऱ्या सहा डंपरवर ९ लाख १२ हजार ९५० रुपये, खडी वाहतुकीच्या सहा डंपरवर १३ लाख ३१ हजार ५० रुपये, तर मुरमाच्या दोन डंपरवर ४ लाख १९ हजार ६५०, असा एकूण १४ वाहनांवर २६ लाख ६३ हजार ६५० रुपये दंड ठोठावला. त्यातील ९ वाहनमालकांनी १३ लाख ७८ हजार ९५० रुपये दंड भरला आहे. इतर पाच वाहनमालकांनी अद्याप दंड भरलेला नाही. 

तहसीलदारांच्या कारवाईमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत. तालुका महसूल प्रशासनास वार्षिक आठ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अशा कारवाईत सातत्य राखणे गरजेचे आहे; अन्यथा नेहमीप्रमाणे फार्स ठरण्याची शक्‍यता आहे. 
मुंगी येथील गोदावरी नदीतील वाळूला राज्यातून मोठी मागणी असते. त्यामुळे लिलाव होवो न होवो, या परिसरातील नदीसह ओढ्या-नाल्यांतून वाळूचा बेसुमार उपसा होतो. महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवित सातत्याने कारवाई केली, तर त्यास निश्‍चित आळा बसेल. मात्र, वाळूचोरांच्या सतर्क नेटवर्कमुळे कारवाईपूर्वीच कुणकुण लागत असल्याने दरवेळी टाकलेला छापा निव्वळ फार्स ठरतो. 

पकडलेली वाहने सोडून देण्याचे प्रकार...  

अवैध वाळूवाहतूक करणारी वाहने पकडल्यानंतर जागेवर तडजोड करून सोडून देण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. शिवाय कारवाईनंतर तहसील किंवा पोलिस ठाण्यात आणलेली वाहनेही परस्पर सोडून देण्याचे प्रतापही झाले आहेत. त्यामुळे प्रशासनातील अशा दुव्यांना शोधण्याचे आव्हान तहसीलदार भाकड यांच्यासमोर आहे.

संपादन- सुस्मिता वडतिले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com