संगमनेर : निळवंडे कालव्यांच्या कामाला गती - महसूल मंत्री थोरात

Revenue Minister Balasaheb Thorat
Revenue Minister Balasaheb Thoratesakal

संगमनेर (जि. अहमदनगर) : ऊसशेती पारंपरिक पध्दतीऐवजी व्यावसायिक पद्धतीने व ठिबक सिंचनाचा वापर करुन एकरी सरासरी 100 मेट्रीक टन उत्पादन घेण्याची आवश्यकता आहे. निळवंडे कालव्यांच्या कामाला गती दिली असून, पुढील वर्षीच्या पावसाळ्याचे पाणी निळवंडेच्या दोन्ही कालव्याद्वारे आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचा पुनरुच्चार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऑनलाईन झालेल्या 54 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

संगमनेरच्या आदर्श सहकाराचे मॉडेल राज्यासाठी दिशादर्शक

राज्यासह तालुक्यातील कोवीड (Covid) स्थितीबाबत चिंता व्यक्त करताना, भावनेपेक्षा वस्तूस्थितीला महत्त्व देत कोवीड नियमांचे पालन करण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेरच्या आदर्श सहकाराचे मॉडेल राज्यासाठी दिशादर्शक ठरले आहे. सर्व सहकारी संस्था तालुक्यातील रचनात्मक काम, सुसंस्कृत राजकारण, ग्रामीण विकास तसेच सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करीत आहे. कारखान्याने एक रकमी एफआरपी (FRP) देताना उच्चांकी भाव दिला आहे. साडेपाच टन क्षमतेच्या नव्या कारखान्याचा हा पाचवा हंगाम असून यावर्षी वीजनिर्मीतीतून 50 कोटीपेक्षा अधीक उत्पन्न मिळाले आहे. कार्यक्षेत्रात जास्त एकरी उत्पादनाची सरासरी वाढल्यास, वाहतूक खर्च कमी होवून उत्पन्न वाढीचा फायदा ऊस उत्पादक व सभासदांना मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे कालव्यांना गती मिळाली आहे. 2 च्या ठिकाणी 35 जेसीबी कार्यरत आहेत. बांधकामे वेगाने सुरु असून यासाठी अकोले तालुक्याचे मोठे सहकार्य लाभले आहे. कारखान्याने मागील हंगामात 13 लाख 19 हजार मेट्रिक टनाचे गाळप करुन 13 लाख 36 हजार क्विंटल साखर उत्पादन केले. एकरी उत्पादन वाढवण्यासाठी कार्यक्षेत्रातील 97 ऊस प्लॉटची निवड करण्यात आल्याची माहिती बाबा ओहोळ यांनी दिली.

Revenue Minister Balasaheb Thorat
वीज मंडळाची भरती कधी? ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे म्हणाले की..

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ होते. या प्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, रणजितसिंह देशमुख, दुर्गा तांबे, लक्ष्मण कुटे, इंद्रजीत थोरात, शंकर खेमनर, उपाध्यक्ष संतोष हासे, अमित पंडित, साहेबराव गडाख, अ‍ॅड. प्रदीप मालपाणी, अ‍ॅड. सुहास आहेर, गणपतराव सांगळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.

Revenue Minister Balasaheb Thorat
आखातात पोचली नेवाशाची डाळिंबे; उच्चशिक्षित शेतकऱ्याचा प्रयोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com